अबाउट ABG ग्रूप

ABG Group इस लार्ज बिज़्नेस ग्रूप, बेस्ड आत मुंबई अँड हॅविंग बिज़्नेस ऑपरेशन्स आत डिफरेंट पार्ट्स ऑफ ते कंट्री.

एबीजी समुह हा मुंबईतील एक मोठा व्यवसाय समुह आहे, आणि देशाच्या विविध भागांमध्ये त्याचा व्यवसाय कार्यरत आहे. ह्या समुहाची वार्षिक उलाढाल रू. 2,000 कोटीपेक्षा जास्त असून तो जहाज बांधणी आणि पायाभूत उद्योगाच्या क्षेत्रात सहभागी आहे.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही ह्या समुहाची महत्त्वाची कंपनी असून ती एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि बीएसई व एनएसई वर तिची नोंदणी करण्यात आली आहे.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही मोठ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांची डिझाईन व बांधणीचे काम करते. सध्या ती भारतातील खाजगी क्षेत्रातील जहाज बांधणी करणारी सर्वाधिक मोठी कंपनी आहे.

एबीजी शिपयार्डची उत्पादन सुविधा गुजरातमधील मगदल्ला बंदर (सुरतजवळ) आणि दहेज (भरूच जवळ) येथे आहे. तिथे संपूर्ण जगातील ग्राहकांसाठी शिपिंग व्हेसल्सची निर्मिती केली जाते.

एबीजी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड ही ह्या समुहाची अजून एक कंपनी आहे जी बंदरे, बांधकाम उद्योग, वगैरेसाठी अवजड यंत्रसामग्री पुरवठ्याचे काम करते.

ह्या समुहाची अजून एक महत्त्वाची कंपनी आहे पीएफएस शिपिंग लिमिटेड. ह्या कंपनीच्या मालकीची जहाजे आहेत आणि ती सागरी वाहतूक व्यवसायात आहे.

एबीजी समुहाने आपल्या व्यवसायात विविधता साध्य करण्यासाठी सिमेंट आणि वीज निर्मिती क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे.