ABOUT ABG CEMENT

एबीजी समुहाने आपल्या व्यवसायात विविधता साध्य करण्यासाठी सिमेंट आणि वीज निर्मिती क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे आणि ह्यासाठी अनुक्रमे एबीजी सिमेंट लिमिटेड व एबीजी एनर्जी लिमिटेड ह्या दोन कंपन्या सुरू केल्या आहेत. ह्या व्यवसायासाठी कंपनीजवळ योग्य आर्थिक स्त्रोत उपलब्ध आहेत आणि कारखाना कार्यान्वित करण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी प्रथम श्रेणीचे व्यवस्थापकीय स्त्रोत उपलब्ध आहेत.

श्री. ॠषी अगरवाल हे एबीजी सिमेंटचे प्रवर्तक आहेत जे एक अतिशय यशस्वी व्यावसायिक आहेत. ते एबीजी शिपयार्ड आणि इतर संबंधित कंपन्या/व्यवसायांचे प्रवर्तक आहेत.

मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ, श्री. प्रदीप कपूर हे एबीजी सिमेंट चे प्रमुख आहेत. श्री. कपूर यांचा 40 वर्षाहून अधिक काळ सिमेंट व्यवसायाशी संबंध आहे.

एबीजी सिमेंट लिमिटेड ही गुजरात मध्ये सर्वाधिक आधुनिक आणि पर्यावरणाभिमुख 6 दशलक्ष टन प्रतिवर्ष (6 एमपीटीए) इतक्या क्षमतेचा सिमेंट कारखाना उभारत आहे. ह्या कारखान्याच्या स्वत:च्या चुनखडीच्या खाणी, जेट्टी आणि डिसॅलिनेशन प्रक्रिया केंद्र आहे. वरील 6 दशलक्ष प्रतिवर्ष सिमेंट उत्पादनाला सहकार्य करता येईल इतकी ह्या सर्व युनिटसची क्षमता आहे. जवळपास असलेल्या एबीजी एनर्जी लिमिटेडद्वारा वीज पुरवठा केला जाईल.

लवकरच एबीजी सिमेंट आपल्या उत्पादन सुविधेचा भारतातील इतर भागांमध्ये त्याचप्रमाणे इतर देशांमध्ये विस्तार करत आहे.

सिमेंट कारखाने ज्या भागात उभारण्यात येत आहेत तेथे पुरेशा प्रमाणात चुनखडी उपलब्ध आहे जो सिमेंट उत्पादनासाठी आवश्यक मूलभूत कच्चा माल आहे. ह्या भागाचा फायदा म्हणजे हा किनारपट्टीचा भाग आहे त्यामुळे रस्ता वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि कच्चा माल व तयार उत्पादन यांची आयात/निर्यात करण्यासाठी मदत होते.

एबीजी एनर्जी लिमिटड द्वारा तयार होणार्‍या 100% फ्लाय अॅशचा आपल्या सिमेंट उत्पादनासाठी उपयोग करण्यास एबीजी सिमेंट बांधिल आहे आणि उर्जेच्या बाबतीत कार्यक्षम तंत्रज्ञानावर आधारित सर्व सिमेंट आणि वीज उत्पादन कारखान्यांची आखणी करण्यात आली आहे.

कंपनीने वेगवेगळ्या कामांसाठी खालील जागतिक दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती केली आहे -

  • मेसर्स होल्टेक कन्सल्टिंग प्राय. लिमि., नवी दिल्ली प्रकल्पाच्या कार्यासाठी टर्नकी कन्सल्टन्ट
  • मेसर्स नॅशनल एन्व्हायर्नमेन्ट इंजिनइरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (एनईईआरआय), नागपूर पर्यावरणविषयक सर्व बाबींसाठी
  • मेसर्स वॅपकोस, नवी दिल्ली आपल्या कॅप्टिव जेट्टीशी संबंधित सर्व गोष्टींसाठी


कारखान्याचे बांधकाम व उभारणीचे काम वेगात सुरू असून 2011 च्या अखेरीस कारखाना सुरू होईल.