प्रदुषण प्रदुषण उपाययोजना

ह्या हरित प्रकल्पात सिमेंट आणि वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. सर्फेस माइनर नावाच्या अत्यंत आधुनिक प्रक्रिया उपकरणाच्या सहाय्याने खाणकाम केले जाईल ज्यामध्ये पारंपारिक पाच टप्पे टाळण्यात आले आहेत उदा. ड्रिलिंग, ब्लास्टिंग, उत्खनन, वाहतूक आणि क्रशिंग. ह्यामुळे खाणकाम विभागातील प्रदुषणात घट होते. सर्व मालाची वाहतूक कव्हर असलेल्या बेल्ट कन्व्ह्येयरच्या सहाय्याने केले जाईल जो वातावरणात धूळ उडणे कमी करण्यासाठी अत्याधुनिक वायू प्रदुषण नियंत्रण उपकरण आणि जेथे आवश्यक असेल तेथे धूळ कमी करणारी यंत्रणा यांनी सज्ज असेल. एबीजी सिमेंट मध्ये रॉ मील आणि किल्न्‌ आऊटलेटमध्ये ग्लास बॅग हाऊस आहे. सिमेंट उद्योगातील हे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार्‍या परिस्थिती दरम्यान देखील ते सुरळीतपणे चालेल. एबीजी एनर्जीमध्ये बॉयलर आऊटलेटसमध्ये परिणामकारक ईएसपीज देखील आहेत.

Certificates :-