सुविधा

एबीजी सिमेंट लिमिटेड गुजरातमधील आपल्या 6 एमपीटीए क्षमतेच्या ग्रिनफिल्ड सिमेंट कारखान्याचे कामगाज सुरू करेल. सिमेंट कारखान्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी एबीजी सिमेंट लिमिटेड पाशी जवळपासच्या विभागाच आपल्या स्वत:च्या चुनखडीच्या खाणी आहेत. वीज ही मूलभूत गरज आहे त्यामुळे एबीजी सिमेंट लिमिटेडची सहकारी कंपनी एबीजी एनर्जी लिमिटेड सिमेंट कारखान्याची आणि त्याच्या स्थानिक वीजेची गरज भागविण्यासाठी 2 x 50 मेगावॅट कोळशावर आधारित वीज निर्मिती कारखान्याची योजना आखत आहे.

वीज निर्मिती कारखान्यासह हा ग्लिनफिल्ड प्रकल्पात सिमेंट आणि वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. खाणकाम करताना पर्यावरणाची सर्वाधिक काळजी घेऊन पारंपारिक यांत्रिकी खाणकाम पद्धतीचा उपयोग केला जाईल. ह्यामुळे खाणकाम क्षेत्रात प्रदुषण कमी करण्यास मदत होईल. सर्व मालाची वाहतूक कव्हर्ड बेल्ट कन्व्हेयरद्वारा केली जाईल जो वातावरणात धूळ उडणे कमी करण्यासाठी अत्याधुनिक वायू प्रदुषण नियंत्रण उपकरण आणि जेथे आवश्यक असेल तेथे धूळ कमी करणारी यंत्रणा यांनी सज्ज असेल. एबीजी सिमेंट मध्ये रॉ मील आणि किल्न्‌ आऊटलेटमध्ये ग्लास बॅग हाऊस आहे. सिमेंट उद्योगातील हे देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार्‍या परिस्थिती दरम्यान देखील ते सुरळीतपणे चालेल. एबीजी एनर्जीमध्ये बॉयलर आऊटलेटसमध्ये परिणामकारक ईएसपीज देखील आहेत.

जल संवर्धनाच्या दृष्टीकोनातून प्रस्थापनेपासून ‘‘शून्य उत्सर्जन’’ पद्धतीचा अवलंब करण्यावर एबीजी द्वारा विचार करण्यात येत आहे. एबीजी एनर्जी लिमिटेड द्वारा एअर कुल्ड कंडेन्सर्सचा उपयोग करण्यात येत आहे ज्यामुळे जवळ जवळ 800 ते 1000 m3 पाण्याचे प्रतिदिन संवधर्न होईल. सर्व सांडपाण्याचे ट्रिटमेन्ट प्लान्टमध्ये शुद्धिकरण केले जाईल आणि त्याचा प्रक्रिया, धूळ कमी करणे किंवा झाडांसाठी पुन्हा उपयोग केला जाईल. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साचविण्यासाठी एबीजी ने 15000 m3 प्रत्येकी क्षमतेचे पाणी अडवून जिरविण्यासाठी खड्डे करण्याचे ठरविले आहे. एबीजी सिमेंट आणि एबीजी एनर्जी लिमिटेडची सामायिक निवासी कॉलनी असून सर्व स्थानिक सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केन्द्रात प्रक्रिया केली जाईल.

स्थापनेपासून एबीजी धोकादायक सांडपाण्याचे व्यवस्थापन करेल. टाकाऊ तेलाचा दुय्यम आणि तिसर्‍या टप्प्यातील लुब्रिकेशनसाठी उपयोग केला जाईल आणि शेवटी ते किल्नमध्ये जाळले जाईल. सर्व टाकाऊ माल MoEFच्या मार्गदर्शनानुसार खबरदारी घेऊन जमा करण्यासाठी स्वतंत्र साठा आणि विल्हेवाट पद्धती विकसित केली जाईल.

आवाज आणि धुळीचा परिणाम कमी करण्यासाठ MoEFच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल. सर्व आतील रस्ते डांबरी असतील आणि रोज ते यांत्रिकि रस्ता सफाई पद्धतीने नियमितपणे स्वच्छ केले जातील.

नियामक एजन्सीजने निश्र्चित केलेल्या सर्व पर्यावरणाच्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण पर्यावरण सेल तयार करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या सर्व निकषांचे मोजमाप करण्याचे काम एक खास अत्याधुनिक पर्यावरण देखरेख प्रयोगशाळा करेल. ह्यामध्ये मॉनिटरिंग व्हॅन आणि ऑन-लाईन यंत्रणा यांचा समावेश आहे.